ठिबक सिंचन योजना ,तुषार सिंचन योजना 80%अनुदान | Drip Irrigation 80% Subsidy 2022 - Marathi Madhe

शनिवार, 22 जनवरी 2022

ठिबक सिंचन योजना ,तुषार सिंचन योजना 80%अनुदान | Drip Irrigation 80% Subsidy 2022

ठिबक सिंचन योजना 2022,तुषार सिंचन योजना 2022,Drip Irrigation,Drip Irrigation 80% Subsidy 2022,

Drip Irrigation 80% Subsidy 2022
Drip Irrigation 80% Subsidy 2022

Drip Irrigation 80% Subsidy : नमस्कार सर्वांना आजच्या या लेखामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आपल्या माहिती असेल राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत राज्यात ठिबक सिंचन तुषार सिंचन सिंचन सुविधा सिंचन योजना राबवली जाते. आपण पाहिलं तर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत 25% ते 30% टक्के पूरक अनुदान दिले जाणार आहे. आणि  शेतकऱ्यांना 75% ते 80% टक्के अनुदान दिले जाणार आहे.

ठिबक सिंचन अनुदान योजना 2022

या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता तर या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या लाभार्थ्यांना 80% टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच किती एकर पर्यंत हे अनुदान मर्यादित आहे.


अनुदान कसे दिले जाईल याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत 25% ते 30% टक्के अनुदान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 45% ते 55% टक्के अनुदान. असे एकूण 80% टक्के अनुदान ते 75% टक्के अनुदान ठिबक  व तुषार सिंचन साठी दिले जाणार आहे.

Drip Irrigation Subsidy

याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्य सरकारने नुकताच महत्वपूर्ण शासन निर्णय शेतकरी बांधवांच्या हितासाठी घेतला आहे. तर राज्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाअंतर्गत 80% ते 75% टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.  या योजनेमध्ये अनुदान कसे दिले जाईल संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे.


शासनाने ठिबक व तुषार सिंचनसाठी अनुदान वाढवली आहेत, यासोबत खर्चाच्या जे मापदंड आहेत यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास सर्वच पिकांसाठी ठिबक व तुषारयासाठी 75% टक्के ते 80% टक्के अनुदान दिले जाणार आहे. जसे पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पिके योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना. (Drip Irrigation 80% Subsidy) जसे ठिबक व तुषार सिंचन या घटकांकरिता लाभ देण्यात येतो.

Thibak Sinchan Yojana Maharashtra

यापूर्वी सदर योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% टक्के. व इतर शेतकऱ्यांना 25% टक्केच्या खर्च मर्यादेत अनुदान देण्यात येत होतं. आता यामध्ये 2021-22 मध्ये शासनाने खर्च मापदंडात वाढ केली आणि त्यामुळेच अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली आहे. सन 2021-22 मध्ये


मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% टक्के अनुदान. तसेच इतरांना 30% टक्के पूरक अनुदान असे एकूण 80% टक्के अनुदान. व इतर शेतकऱ्यांना (5 हेक्टर) च्या मर्यादित 45% टक्के अनुदान मिळून असे पूरक अनुदान 30% टक्के. असे एकूण 75% टक्के इतर शेतकऱ्यांना दिले जाणार आहे असे एकूण 80% ते 75% अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ठिबक सिंचन 80% अनुदान कसे मिळेल ? 

(5 हेक्टरच्या मर्यादेत) देय 45% टक्के अनुदानास पूरक अनुदान 30% टक्के देय आहे. यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 80% टक्के व इतर शेतकऱ्यांना 75% टक्के अनुदान मिळेल. या योजने अंतर्गत (1.2 बाय 0.6 मीटर लटरल अंतर) सध्या 1 हेक्टर ठिबक सिंचनासाठी खर्च मर्यादा 1 लाख 27 हजार 501 रुपये आहे.


ठिबक 80% अनुदान कसं मिळेल ? 

2021-22 मधील देय अनुदानात 80% टक्के 1 लाख 2 हजार १ रुपये, तर 75% टक्के 94 हजार 626 रुपये आहे. (1.5 बाय 4.5 मीटर लटरल अंतर) मध्ये खर्च मर्यादा 97 हजार 245 रुपये आहे. 2021-22 मध्ये अनुदान 80% टक्के 77 हजार 796 रुपये आणि 75% टक्के मध्ये 72 हजार 934 रुपये मिळेल.

तुषारसाठी 80% अनुदान कसे मिळेल ?

असे मिळेल अनुदान तुषार सिंचन क्षेत्र एक हेक्टरपर्यंत (75 mm) 24 हजार 194 रुपये मापदंड मंजूर आहे. यानुसार 80% टक्के अनुदान 19 हजार 355रुपये.  75% टक्के अनुदान नुसार 18 हजार 145 रुपये अनुदान. 2 हेक्टरच्या मर्यादेत (75 mm) 34 हजार 657 रुपये खर्चाच्या मापदंडानुसार 80% टक्के अनुदान 27 हजार 725रुपये,  75% अनुदान नुसार 25 हजार 992 अनुदान मिळेल.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder